काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवाची सांगता.

जवळे(प्रशांत चव्हाण) हरीच्या रथात जोपर्यंत आपण बसत नाही तोपर्यंत आपण पैलतीरापर्यंत जात नाही.हरीने हरीले माझे चित्त चित्त जर समाधानी असेल तर दगडालाही पाझर फुटतो म्हणून महाराज म्हणतात चित्त शुद्ध करण्यासाठी भगवंताचे नामचिंतन करावे लागते.तुका म्हणे जाग व्हावं आता नाम तुझे पंढरीनाथा माणसाने कायम जाग राहावं आपल्याला परमेश्वर कळत नाही तोपर्यंत देवाला शरण गेल्याशिवाय जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. म्हणून महाराज म्हणतात साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे मौलिक विचार ह भ प वसंत महाराज काटे यांनी श्री.नारायण देव मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवाच्या सांगता प्रसंगी व्यक्त केले.
पुढे बोलताना महाराज म्हणाले भगवंताची भक्ती करायची असेल तर प्रेमाने करा सर्वांच्या मुखांमध्ये भगवंत परमात्म्याचे नाव कायम ठेवा. तरच आपल्याला भगवंत परमात्मा प्रसन्न होईल. तसेच महाराजांनी श्रीकृष्णाचे वर्णन करताना सांगितले भगवान श्रीकृष्णाने अनेक सवंगडी जमा केले गोकुळात काला करण्यासाठी आल्या आल्या ग गवळणी नंदाच्या दारी यावेळी यशोदा माता श्रीकृष्णाला म्हणते ये कृष्णा खोड्या करणे तू बंद कर भगवान श्रीकृष्णाने गोकुळात अनेक खेळ मांडले आणि त्यात काला ही केला. आपण जन्माला आल्यावर आपल्याला काला मिळतो तो काला आपण खावा. असे सांगत महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना श्रवणीय कीर्तनाचा आनंद दिला.
कीर्तनानंतर काटे महाराज व सहकाऱ्यांच्या हस्ते हंडी फोडण्यात आली. त्यानंतर व्यासपीठ चालक, काकडाचालक,भजनी मंडळ मृदंगमणी,विण्याचे सेवेकरी,चोपदार, ह.भ.प.डॉ बिरा महाराज बंडगर,पत्रकार,साऊंड सिस्टिम चालक,यांचा सन्मान श्री. चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.साहेबरावदादा पाटील,श्री.अनिल साळुंखे(चेअरमन) यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत सुतार,श्री.दीपक चव्हाण श्री. रमेशआप्पा साळुंखे,श्री.आबासाहेब बावदाणे,श्री.बाळासाहेब वाघमारे,श्री.पिंटू मधुरे श्री.जयवंतराव नागणे गुरुजी यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी जवळे गावातील महिला व पुरुष भाविक भक्त उपस्थित होते. भाविक भक्तांना सायंकाळी 8 ते 11 या वेळेत मुंगी उडाली आकाशी ही चित्रपीत दाखवण्यात आली.