सांगोला विद्यामंदिरची दिपाली दोलतडे व प्रतीक्षा येलपलेची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

सांगोला (प्रतिनिधी) दिनांक २१ व २२ ऑक्टोबर २०२३रोजी शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी पुणे येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये  सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील खेळाडूनी सुयश संपादन केले.
यामध्ये १९ वर्षे मुली वयोगटामध्ये  दिपाली  दोलतोडे इ. ११वी संयुक्त भालाफेक स्पर्धेमध्ये २५.१० मिटर भालाफेक करून प्रथम क्रमांक  व  प्रतीक्षा  येलपले ११वी शास्त्र गोळाफेक स्पर्धेमध्ये १०.०५ मिटर गोळाफेक करून द्वितीय क्रमांक मिळवत  राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी प्रवेश मिळविला.तसेच सुमित सांगोलकर  इयत्ता ११ वी शास्त्र  बांबूउडी  स्पर्धेमध्ये २.३० मी.उडी टाकुन तृतीय क्रमांक तर १७ वर्षे वयोगट मुले संघाने रिलेमध्ये   तृतीय क्रमांक मिळविला यामध्ये सचिन चव्हाण इ. १० वी, श्रीकांत चव्हाण  इ.१०वी,प्रसाद शिनगारे  इयत्ता ११वी,ओम साळुंखे  इ. ९ ,ऋषिकेश घाडगे ११वी यांचा सहभाग होता.
वरील सर्व यशस्वी खेळाडूंना , क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज प्रा. डी.के पाटील, सुभाष निंबाळकर, नरेंद्र होनराव, प्रा.संतोष लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
 या  सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य गंगाधर घोंगडे , उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते,उपप्राचार्य शहिदा सय्यद ,पर्यवेक्षक अजय बारबोले, बिभिषण माने, पोपट केदार (क्रीडा नियंत्रक) व क्रीडा शिक्षक उपस्थित  होते.
तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे ,खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, सर्व संस्था सदस्य,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa