मा.आमदार,स्व.डाॅ.गणपतरावजी देशमुख यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला येथे नुकत्याच तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात उल्लेखनीय यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली.
यामध्ये संस्कृती संतोष लोंढे- द्वितीय क्रमांक (इ.5वी ते 7वी गट), वैशाली जनार्दन हजारे-तृतीय क्रमांक (इ.8वी ते 10वी गट) आणि सृष्टी सुनील लिगाडे-द्वितीय क्रमांक (इ.11वी- 12वी गट) या विद्यार्थिनींनी उज्वल यश मिळवत रोख पारितोषिकांसह स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र संपादन केले.
वरील विद्यार्थ्यांना वाड़मय विभाग प्रमुख उन्मेश आटपाडीकर व शिवशंकर तटाळे यांच्यासह विभागातील दत्तात्रय पाटील, श्रीकृष्ण वाघमारे, शिवानंद लोखंडे, संध्या तेली, प्रशांत रायचुरे, शैलजा झपके, अनिता घोंगडे, धनाजी चव्हाण, अर्चना कटरे, राधा रिटे, मेहेर ढवळे, सू-याबा आलदर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.