सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व प्राथमिक विद्यालय सांगोला यांचे राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेमध्ये सुयश .

मेट्रो ब्रेन अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे सातवी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा- 2023 आळंदी देवाची या ठिकाणी दिनांक 29/10/2023 वार रविवार रोजीआयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल व सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

 

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल ची इयत्ता चौथीची विद्यार्थीनी श्रुती श्रीरंग माळी ही महाराष्ट्रातून तिसरी आली आहे व तिने दुसरी रँक प्राप्त केली. तिला टॉपर ऑफ द टॉपर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे. सन्मानचिन्ह ,प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल असे बक्षिसाचे स्वरूप तिला प्राप्त झाले आहे . सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय सांगोला येथील इयत्ता पहिलीची विद्यार्थीनी कु.आरोही सचिन चव्हाण हिने महाराष्ट्रातून सेकंड रॅंक पटकावला आहे. या विद्यार्थिनीस सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व गोल्ड मेडल असे बक्षिसाचे स्वरूप प्राप्त झाले आहे याबरोबरच विद्यालयातील विद्यार्थी अदिराज कोळसे पाटील ,अंशू कदम ,प्रणव लांडगे ,आलिया तांबोळी ,सत्यम कुराडे , यशराज इंगोले, भावना इंगोले , सोहम साळुंखे, जयेश जाधव ,विराज जाधव, युगंधरा देशमुख ,आरव लांडगे . रितेश राजवाडे, भावना इंगोले, निल पाटील. या विद्यार्थ्यांना Achiever ट्रॉफी ,गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना कु. दिपाली बसवदे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके,संस्थासचिव श्री.म.शं.घोंगडे,सहसचिव श्री.प्रशुध्दचंद्र झपके,खजिनदार श्री.शं.बा.सावंत,कार्यकारिणी सदस्य श्री.विश्वेश झपके ,सर्व संस्थासदस्य तसेच इंग्लिश मेडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे मॅडम प्राथमिक विद्यालयाचे प्र..मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे सर व पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु.रोहिणी महारनवर मॅडम यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!