सांगोला तालुका ग्रंथालय संघ अध्यक्षपदी हरिदास घोडके तर उपाध्यक्षपदी संजय सरगर यांची बिनविरोध निवड

सांगोला तालुका ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटी शाखा – सांगोला कार्यालयात उत्साही वातावरणात ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अशोकराव गंगाधरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नवीन कार्यकारी मंडळ अध्यक्षपदी हरिदास घोडके पाचेगांव बु उपाध्यक्ष संजय सरगर सावे कार्याध्यक्ष मच्छिंद्र मिसाळ चिणके सचिव अशोक व्हटे सांगोला सहसचिव रणजीत भगत हातीद खजिनदार बिरुदेव काळे बुध्देहाळ प्रसिद्धीप्रमुख औदुंबर काळे शिवणे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप पाटील यांनी काम पाहिले तर संचालक पदी लक्ष्मण दिघे वाढेगांव ,राजेंद्र इंगोले एखतपूर ,सुनिल इंगवले बुरलेवाडी ,नागन्नाथ इंगोले कडलास ,एकनाथ फाटे ,दत्ताञय पाटील आलेगांव ,सन 2023 ते 2028 या पाच वर्षाकरीता यांची सर्वानूमते बिनविरोध निवड झाली सर्वाचे अभिनंदन होत आहे. सभेचे प्रास्ताविक सूञसंचालन अशोक व्हटे यांनी केले आभार बिरुदेव काळे यांनी मांडले .यावेळी तालुका संघाचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष, राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य ग्रंथमिञ गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन पर आपले मनोगत व्यक्त करून नवीन संचालक मंडळास शुभेच्छा देऊन चळवळीत आपले योगदान देऊन जबाबदारीने कामगिरी पार पाडावी असे आवाहन केले.
.यावेळी नूतन अध्यक्ष हरीदास घोडके यांनी ही मनोगत व्यक्त करुन सर्वाचे सहकार्याने आपले कामकाज चढतेक्रमाने असेल अशी ग्वाही दिली. यावेळी आपले मावळते अध्यक्ष अशोकराव गंगाधरे ,संजय सरगर ,बिरुदेव काळे ,रणजित भगत यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संजय पवार ,मच्छिंद्र जगताप ,शरद कोळवले उपस्थित होते..चहापान नंतर सभेचे कामकाज संपले.