वाढेगाव येथील पार्वती विठ्ठल ननवरे यांचे निधन

सांगोला: वाढेगाव येथील रहिवासी,प्राथमिक शिक्षक संतोष ननवरे यांच्या मातोश्री पार्वती विठ्ठल ननवरे यांचे काल ६ नोव्हेंबर रोजी त्यांचे राहते घरी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पती,२ मुले,३विवाहित मुली,नातवंडे,परतवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीचा कार्यक्रम बुधवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता वाढेगाव येथील स्मशानभूमीत होईल असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.