कॅन्सरच्या विरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज: प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे

सांगोला :-(कोल्हापूर) कॅन्सर या असाध्य आजाराची रुग्णावर असणारी पकड ही खेकड्यांच्या नांग्याप्रमाणे मजबूत असते. कॅन्सर हा आजार अलीकडच्या काळातील नसून इसवीसन पूर्व काळापासून जीवाश्म पुराव्यांवरून मनुष्य कॅन्सरग्रस्त असल्याचे पुरावे सापडतात. कॅन्सरचे शंभरहून अधिक प्रकार असून कॅन्सर टाळण्यासाठी नैसर्गिक जीवनशैली चा अवलंब, ताण तणाव मुक्ती, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, लक्षणांवरून लवकर निदान करून घेणे व कॅन्सर प्रतिबंधासाठी लसीकरण, कीटकनाशकांच्या दुष्परिणाम पर दुष्परिणामा पासून वाचण्यासाठी भाज्या खाण्याचा सोडा किंवा मिठाच्या पाण्यात धुऊन घेणे यासारखे प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे आहेत. कॅन्सर विरोधात एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज आहे असे प्रतिपादन सांगोला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश अरुण बनसोडे यांनी केले.
राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिनानिमित्त आयोजित “कॅन्सर: कारणे लक्षणे व प्रतिबंध” या विषयावरील व्याख्यानामध्ये कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणित विभाग प्रमुख डॉ. एस पी थोरात हे होते.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक प्रबोधिनी प्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. संजय अंकुशराव यांनी करून दिली. आभार प्रा. कैलास पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सुप्रिया पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांनी विशेष परिश्रम घेतले.