मिरज रोड भुयारी रेल्वे मार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण :- शहीद अशोक कामटे संघटना.
*भुयारी मार्गात पथदिवे नसल्याने नागरिकांची गैरसोय*

सांगोल्यातील मिरज रेल्वे गेट क्रमांक(32A) परिसरातील भुयारी मार्ग येथील सांडपाणी व रस्त्याची दुरावस्था दुरुस्त करा व या ठिकाणी पथदिवे बसवावेत अशा आशयाचे पत्र शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांना देण्यात आले.
या मार्गात रेल्वे पुलाखालून सातत्याने होत असलेली पाण्याची गळतीमुळे या ठिकाणी सातत्याने लहान- मोठे अपघात दररोज घडतात त्याचबरोबर येणारा जाणाऱ्या दुचाकी स्वारावर पाणी पूर्णपणे उलट दिशेने येत असल्याने दररोज गेल्या दोन महिन्यांपासून वादावादीचे प्रकार नागरिकात घडत आहे . त्याचबरोबर संध्याकाळी या ठिकाणी पूर्णपणे अंधार असल्याने पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला स्वतंत्र पथदिवे बसवावेत.हे सर्व थांबवण्याकरता आवश्यकता त्या उपायोजना करावे .या भुयारी मार्ग सुरू झाल्यापासून वारंवार समस्या निर्माण होत आहेत, परिणामी पावसाळ्यात या भागातील अनेक नागरिकांची गैरसोय प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत .मिरज रोड परिसरात एमायडिसी, सूतगिरणी ,अनेक मोठे उद्योग समूह ,शाळा कॉलेजेस आहेत ,येथे जाणाऱ्या- येणाऱ्या नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सांगोला शहरातील मिरज रेल्वे गेट क्रमांक (32A) व 32 बी महूद रेल्वे गेट भुयारी मार्गाची नेहमीच्या पाणी गळतीमुळे अत्यंत दुरावस्था झालेली आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून येथे पाण्याचे झरे वाहत आहेत, त्यामुळे वाहन चालकांना या पुलाखालून वाहन चालवताना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर सततच्या पाण्यामुळे येथे मोठमोठे खड्डे पडून सातत्याने छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. येथील काम पूर्णपणे चांगल्या दर्जाचे झालेले नाही, वारंवार आपल्या प्रशासनास निदर्शनास आणून याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच महूद रोड येथील गेट नंबर 32 बी इथेही आपल्या रेल्वे हद्दीत रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे तरी आपण आपल्या संबंधित प्रशासनास तात्काळ येथील कायमस्वरूपी उपाययोजना करून दुरुस्तीची काम हाती घ्यावी अन्यथा येथील खड्ड्यात व पाण्यात संघटनेतर्फे वृक्षारोपणाचा उपक्रम घेणार असल्याचे सांगितले .तात्काळ दखल न घेतल्यास शहरातील नागरिक या प्रश्न सांगोला रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणार आहे. याची जबाबदारी संपूर्ण रेल्वे प्रशासनाची राहील. त्याच बरोबर हा मार्ग नादुरुस्त असल्याने या रोडची दुरावस्था अधिकच बिकट झाली आहे.

या भुयारी मार्गात पहिल्या व शेवटच्या पावसात मोठा फज्जा उडालेला दिसून आला, या भुयारी मार्गात कमीत कमी 10 ते वीस फूट पाणीसाठा असून भविष्यात या मार्गावरील वाहतूक ही सोइची न होता गैरसोयीची होत आहे , रेल्वे विभाग हे काम पूर्णपणे दर्जेदार होण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हा रस्ता वेळेत दुरुस्त करून व पाण्याची गळती न थांबल्यास राहिली तर पुढील 2 ते 3 महिन्यात ब्रिजला धोका पोहचू शकतो, काम पूर्ण झाले तरी या बोगद्याचे फार मोठा फायदा नागरिकांना होताना दिसत नाही , या मोठ्या बोगद्याचे काम अवलंबून असून रेल्वे विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे
येत्या आठ दिवसात या मार्गाचे अर्धवट काम पूर्ण न केल्यास या भागातील नागरिकांच्यावतीने शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना रेल रोको आंदोलन करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नीलकंठ शिंदे सर यांनी सांगितले.