सांगोला विद्यामंदिरमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे.
जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे अगदी शालेय स्तरापासून विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आवश्यक आहे. या हेतूने पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक ३जानेवारी २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ,सागोला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन संस्था सचिव म.शं.घोंगडे यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते..