मेडशिंगी येथील इंद्रायणी फाउंडेशनच्यावतीने 105 महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

सांगोला (प्रतिनिधी):-मेडशिंगी येथे 2019 साली स्थापन झालेल्या इंद्रायणी फाउंडेशन मेडशिंगी या बहुउद्देशीय संस्थेने दीपावली सणाचे औचित्य साधून स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी 105 महिलांना या फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी 10 वस्तूचेे जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मानव संसाधन अधिकारी कोरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक गजानन बनकर उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीच्या पाटील मॅडम यांनी महिलांना आरोग्य विषयी प्रबोधन केले. यावेळी महिला सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन कल्पना शिंगाडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर कसबे, बसवेश्वर झाडबुके उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नष्टे सर यांनी केले.
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे ही संस्था विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण करीत असल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांचे कौतुक होत आहे.