क्रीडामहाराष्ट्रसांगोला तालुका

सिकंदर शेख नवा ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल हाती आला आहे. गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये अंतिम लढत झाली.या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आस्मान दाखवत ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे.

 

 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिंकदर शेख अंतिम फेरीत दाखल झाला होता, तर तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला धुळ चारत शिवराज राक्षेने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

सिकंदर शेख आणि शिवराज राक्षेमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखला सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र यंदा त्याने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत आपणच कुस्तीचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे.

सिकंदरचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ. घरात आजोबांपासून कुस्तीची परंपरा, पण घरात अठराविश्य दारिद्रय अन गरिबी. सिकंदर शेखचे वडिल रशिद शेखसुद्धा पैलवानकी करायचे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत सिकंदरनेही लाल माती अंगावर घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!