*सांगोला विद्यामंदिरमध्ये शै.वर्ष सन २०२४-२५मध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.* 

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यू .कॉलेज सांगोला येथे शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये १५ जून २०२४ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ५ वी ते १२ वी मधील वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत  करण्यात आले.यामध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी या विद्यार्थ्यांचे स्वागत सकाळ सत्रामध्ये करण्यात आले. व  ५ वी ते ८ वी मधील विद्यार्थ्यांचे स्वागत दुपार सत्रामध्ये करण्यात आले.

सदर स्वागत समारंभ संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य  अमोल गायकवाड,उपप्राचार्य शाहिदा सय्यद,शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात  गुलाब पुष्प देऊन संपन्न झाला.
सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  व संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील नवागत विद्यार्थी व पालकांच्या  हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
 यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील  शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या पहिल्या दिवशी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना संस्था सचिव म.शं.घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड यांचे हस्ते मोफत पुस्तक वाटप करण्यात आले.तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर  कॉलेजमध्ये पदोन्नतीने नियुक्त पर्यवेक्षक, नव्याने व बदलीने रूजू झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.व  बदलीने इतर शाखेत गेलेल्या शिक्षकांना सन्मान  करून निरोप देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button