चिकमहुदच्या सरपंच शोभा कदम यांचा सौ. रुपमती साळुंखे पाटील व जवळ्याच्या सरपंच सुषमा घुले यांच्याहस्ते सत्कार संपन्न
जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचाऱ्यांना बोनस वाटप

संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिकमहुद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या शोभा सुरेश कदम यांची नुकतीच निवड झाली. सरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर नूतन सरपंच शोभा कदम यांनी जवळा ता सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सौ रूपमती दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा घुले यांनी नवनिर्वाचित सरपंच शोभा कदम यांचा सत्कार केला.
यावेळी जवळा ग्रामपंचायतीच्या वतीने सौ रूपमती साळुंखे पाटील तसेच जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुषमा घुले आणि चिकमहुदच्या सरपंच शोभा कदम यांच्याहस्ते कर्मचाऱ्यांना दिवाळी निम्मित बोनस आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, सौ रुपमती दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह यशराजे साळुंखे, ज्येष्ठ नेते अरुणभाऊ घुले, विजयकुमार साळुंखे, विजय येलपले, सुरेश कदम, सुनील आबा साळुंखे, दत्तात्रय बर्वे, प्रमोद साळुंखे, नासीर शेख, नवाज खलिफा, विजयकुमार तारळकर, संजय साळुंखे, विठ्ठल (बिनु) गयाळी अनिल सुतार आदी उपस्थित होते.
चिकमहुद ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच शोभा सुरेश कदम आणि ज्येष्ठ नेते सुरेश कदम यांनी स्व शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन काकींच्या आठवणीना उजाळा दिला. स्व काकींनी नेहमीच कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आपल्याला प्रेम आणि माया दिली असल्याचेही यावेळी सुरेश कदम आणि सौ शोभा कदम यांनी आवर्जून नमूद केले. जवळा ग्रामस्थ आणि साळुंखे पाटील परिवाराच्या वतीने सौ रुपमती दिपकआबा साळुंखे पाटील आणि सरपंच सुषमा घुले यांनी नूतन सरपंच सौ शोभा कदम यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.