सांगोला तालुका

ऐन दिवाळी सणाच्या काळात चिकमहूद परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सांगोला – ऐन दिवाळी सणाच्या काळात चिकमहूद (ता. सांगोला) अंतर्गत आसलेल्या  देवकाते वस्ती,मोरेवस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वाडी वस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्यास ठार केल्याचे नागरिक सांगत आहेत दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सांगोला वन विभागाकडून या परिसरात गस्तही सुरू केली आहे तर चिकमहुद ग्रामपंचायतीतर्फे ध्वनी प्रेक्षकावरुन चिकमहूद वाड्या वस्त्यावरील शेतकरी बांधव, नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन केल्याचे सरपंच शोभा कदम यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील चिकमहूदतंर्गत मोरेवस्ती,कदमवस्ती,पाटीलवस्ती, बंडगरवाडी,मुळेवस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती आहे.सर्वत्र उसाचे शिवार असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नाकारता येत नाही दरम्यान कदमवस्ती येथील समाधान कदम व दयानंद कदम पिता पुत्रांना दुचाकीच्या प्रकाश झोतात शुक्रवारी ७:३० च्या सुमारास मोरे वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन होताच त्यांनी घाबरून दुचाकी दुसऱ्या रोडने घराकडे घेवून गेले.त्याचवेळी  सतीश देवकते यांच्यासह इतरांनाही हा बिबट्या दिसला.मोटर सायकलचा आवाज,प्रकाश व लोकांचा गोंधळामुळे  बिबट्याने तेथून धूम ठोकल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी वन कर्मचारी, वनरक्षक यांचेसह  मोरे वस्ती ठिकाणी भेट देवून परिसराची पाहणी केली.ज्यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिला त्यांच्याशी चर्चा केली.फोटो वरून ही बिबट्याची मादी असण्याची शक्यता असण्याची वर्तवली जात आहे.
———————————————
चौकट – चिकमहूद मोरे देवकाते वस्ती परिसरात बिबट्या असल्याचे माहिती आ शहाजी बापू पाटील यांनी दिली त्यानंतर सदर ठिकाणी  भेट देऊन प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी चर्चा केली. मोबाईल वरील फोटो व पायाच्या ठशावरून बिबट्याची मादी असण्याची शक्यता आहे तरीही खात्री करून वरिष्ठाच्या परवानगी नंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल – तुकाराम जाधवर , वनपरिक्षेत्र अधिकारी ,सांगोला
One attachment • Scanned by Gmail

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!