भरधाव रेल्वे खाली सापडून ७५ वर्षीय वृद्ध महिलेसह वृद्ध मुलगा जागीच ठार

सांगोला – भरधाव रेल्वे खाली सापडून ७५ वर्षीय वृद्ध महिलेसह तिचा ६० वर्षीय वृद्ध मुलगा जागीच ठार झाला. ही घटना काल शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास पंढरपूर – सांगोला रेल्वे लाईनवरील म्हसोबा देवस्थान जवळ घडली. मिजासबी इस्माईल मुजावर -७५ व इन्नुस इस्माईल मुजावर -६० दोघेही रा. मांजरी ता. सांगोला असे मृतांची नावे आहेत. याबाबत, आरिफ इस्माईल मुजावर रा. मांजरी यांनी पोलिसात खबर दिली असून , पोलिसांनी अकस्मित अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शनिवारी दुपारी ३:३० च्या सुमारास सांगोला पंढरपूर रेल्वे लाईनवरील रुळावर वृद्ध महिलेसह पुरुष असे दोघांचे मृतदेह रुळावर मृतावस्थेत पडले होते. सदर घटनेची माहिती मांजरी पोलीस पाटील किशोर पाटील यांनी आरिफ मुजावर यांना सांगितले त्यानंतर आरिफने घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्याची आई मिजासबी मुजावर व भाऊ इन्नुस मुजावर दोघांचे मृतदेह असल्याचे खात्री पटल्याने दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिले. पुढील तपास पोलीस हवालदार चंद्रकांत गोडसे करीत आहेत.