सांगोला न्यू इंग्लिश स्कूलच्या 1999-2000 सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-एस एस सी 1999-2000 च्या बॅचचे विद्यार्थी सर्वांनी स्नेहमेळावा न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे आयोजित केला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव शिंदे होते. तसेच सेवानिवृत्त शिक्षक श्री.इमडे सर, वसंत शिंदे सर, राहुल मोरे सर, दशरथ जाधव सर, माणिक देशमुख सर, दत्तात्रय पांचाळसर, नीलकंठ लिंगे सर उपस्थित होते.

प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत डॉक्टर मानस कमलापुरकर यांनी केले सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व शाळेविषयी व शिक्षकांच्या आठवणी व्यक्त केल्या. विविध ठिकाणाहून रजा टाकून कार्यक्रमासाठी आले होते. सर्वांनी आपला परिचय करुन दिला. बर्‍याच जणांनी खुमासदार शैलीत शिक्षकांच्या अ‍ॅक्टींग, आम्ही सरांना कसे फसवत होतो हे सांगून सर्वांनाच हसविले. शिक्षकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवल्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठमोठ्या पदावर पोहोचलो असे अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर काहींनी सांगितले की आम्ही आमच्या व्यवसायामध्ये व शेतीमध्ये सुद्धा चांगले यश संपादन केले आहे शिक्षणाबरोबरच व्यवहाराचे सुद्धा इतके चांगले धडे सरांनी  दिले त्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो असे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात विचार मांडले.

सर्व शिक्षकांनी त्यांच्या सुद्धा मनोगतामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी ना उजाळा दिला व विद्यार्थ्यांनी असेच मोठमोठे होऊन यश संपादन करावे असा  आशीर्वाद दिले. यावेळी प्रवीण मराळ, गोपाल चोथे, मकरंद पाटील, तायाप्पा माने, नंदू बनसोडे, मानस कमलापूरकर, दीपक शिनगारे, पोपट राऊत, महेश जाधव, अण्णासाहेब मेटकरी, अल्लामीन बागवान, अशपाक मुलानी, कीर्ती जावळे, ज्योती काटे, सारिका दीक्षित, शितल खटके, प्रताप देशमुख, सोमनाथ बनसोडे, सारिका केदार, रोशन बनसोडे, श्रीकांत सोनवणे, सुनील बेहेरे, इंद्रजीत चांडोले, जोतिबा धोकटे,  रणजीत गाडे, सचिन चांडोले, महेश ढेबे, सुलेमान मुलानी, शहाजी बंडगर, सतीश गडदे, संजय घुसाळे, दीपक शिनगारे, सचिन चने आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.आभार गोपाल चोथे यांनी मानले.  सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभोजन करून गाणी नृत्य शेरो शायरी जोक चिटकुले कला सादर केल्या. पुढील वर्षी या बॅचने सहकुटुंब दिवाळीत एकत्र यायचे ठरले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल चोथे डॉ.मानस कमलापुरकर, तायाप्पा माने, अण्णासाहेब मेटकरी, मकरंद पाटील,  पोपट राऊत, दीपक शिनगारे, प्रताप देशमुख, प्रवीण मराळ, अल्लामीन बागवान, नंदू बनसोडे, सुनील बेहरे, महेश जाधव, ज्योती काटे  यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button