महूद येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सौ.अंजना येडगे तर व्हा.चेअरमन पदी संतोष देशमुख यांची बिनविरोध निवड

महूद(ता.सांगोला) येथील विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शेतकरी कामगार पक्षाच्या सौ.अंजना केशव येडगे तर व्हा. चेअरमन पदी संतोष शशिकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी शिवाजी कोळेकर यांनी आपल्या चेअरमन पदाचा व दत्तात्रय डोंगरे यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या निवडीसाठी नुकतीच विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी सोसायटीच्या ऑफिस मध्ये मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चेअरमन पदासाठी सौ.अंजना केशव येडगे यांचा तर व्हा. चेअरमन पदासाठी संतोष शशिकांत देशमुख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमर गोसावी यांनी जाहीर केले.सचिव प्रभाकर सातपुते यांनी सहकार्य केले.

यांनतर नूतन चेअरमन सौ.अंजना केशव येडगे व व्हा.चेअरमन संतोष देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शिवाजी कोळेकर, दत्तात्रय डोंगरे, कृष्णदेव येडगे, विठ्ठल येडगे ,सुखदेव येडगे, रज्जाक मुलाणी,सिद्धेश्वर मेटकरी, वैभव कांबळे,यशवंत गोडसे,रूपाली केसकर सर्व संचालक उपस्थित होते.
तसेच यावेळी बाळासाहेब पाटील, शंकर पाटील, शहाजान मुलांनी ,अंकुश येडगे, दादा महाजन,धनंजय मिटकरी, शिवाजी कोळेकर,राजेंद्र देशमुख,लिंगराज येडगे, महादेव येळे,शिवाजी मोरे,दिगंबर येडगे,आप्पा बाबर,संजय पाटील, संतोष पाटील,समाधान येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.