सांगोला विदयामंदिर प्रशाला सांगोला एस.एस.सी.बँच-१९९८ स्नेह मेळावा संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोलाच्या एस.एस.सी बॅच १९९८ स्नेह मेळावा अतिशय आनंदी व उत्साहात प्रशालेच्या प्रांगणात नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.पी.सी.झपके सर तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान प्राचार्य मा.गंगाधर घोंगडे सर,उपप्राचार्या सौ.सय्यद, माजी प्राचार्य संजीव नाकील माजी उपमुख्याध्यापक अब्दुलगणी सय्यद सर, माजी प्राचार्य बजरंग लिगाडे माजी पर्यवेक्षक दामोदर नागणे सर,मा. अमर गुळमिरे माजी पर्यवेक्षक बबन बुंजकर, माजी प्राचार्य भीमाशंकर पैलवान सर, नारायण काका राऊत, नाईक दत्तात्रय देशमुख हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व गुरुवर्यांचा फेटा बांधून तसेच श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले, नंतर १९९८ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे आणि शिक्षकांचे मनोगत झाले.हे गेट टुगेदर यशस्वीरित्या नियोजन केल्याबद्दल मा.संतोष महिमकर यांचा सत्कार करण्यात आला.

नंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख सांगितली नंतर दिवंगत वर्गमित्र, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनी फोटो काढले. यावेळी सर्व वर्गमित्र व शिक्षकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
प्रशालेच्या पटांगणात बास्केटबॉल, क्रिकेट, गप्पागोष्टी, डान्स असे विविध मनोरंजनात्मक भरगच्च कार्यक्रम विद्यार्थ्यांनी घेतले.
कार्यक्रमाची सांगता बॅचचे विद्यार्थी मा.डॉ.पियुष पाटील यांनी दिलेल्या गेट-टुगेदर फोटो फ्रेम देऊन करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. वैभव कोठावळे सर व अमोल महिमकर सर यांनी केले तर आभार मा.चंद्रशेखर हिरेमठ सर यांनी मानले.कार्यक्रम पार पाडण्यासाठी गणेश पाटोळे ,सुनील पवार, पंकज जाधव ,प्रवीण अरबळी ,सचिन पुणेकर, प्रताप इंगोले, वैभव कोडग,विजय नलवडे,संदीप स्वामी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.