सांगोला तालुका

ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी नगराध्यक्ष चषक 2023 सांगोला तालुका मर्यादित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला नगर परिषदेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने यांचे चिरंजीव ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष चषक 2023 सांगोला तालुका मर्यादित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धा सांगोला क्रीडा संकुल येथे मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत .

HTML img Tag    

 

HTML img Tag    

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे 1 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस माजी नगरसेवक आनंदाभाऊ गोरख माने संस्थापक अध्यक्ष राजमाता प्रतिष्ठान सांगोला यांच्याकडून देण्यात येणार आहे .तसेच द्वितीय क्रमांकाचे 1 लाख रुपयाचे बक्षीस गावडे पेट्रोलियम , गावडे उद्योग समूहाचे मालक प्रशांत गावडे व हणमंत (दादा )चव्हाण संस्थापक अध्यक्ष राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान ,सांगोला यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच तृतीय क्रमांकाचे 75 हजार रुपयांचे बक्षीस माजी धनगर समाज सेवा मंडळ सांगोला, माजी अध्यक्ष काशिलिंग (बाबू )गावडे व माने ऑटोमोबाईल्सचे मालक सागर विजय माने व इंजिनिअर दिनेश येडगे यांच्याकडून देणार आहे .चतुर्थ क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे बक्षीस माजी नगरसेवक सिद्धेश्वर (नाथा) जाधव व युवा सेना तालुका अध्यक्ष दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्याकडून देण्यात येणार आहे. चषक सौजन्य कै. सुभाष( आप्पा) लिंगे यांच्या स्मरणार्थ गणेश मोबाईल शॉपी  यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. मालिकावीर अण्णासो  मारुती गडदे यांच्यातर्फे वाशिंग मशीन देण्यात येणार आहे. बॉल सौजन्य धनगर समाज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. प्रत्येक सामना सामनावीर आकर्षक ट्रॉफी उल्हास मेटकरी यांच्याकडून देण्यात येणार आहे . क्वाटर फायनल  पासून मॅन ऑफ द मॅच रॉयल स्पोर्टचे भारत शिंदे यांच्यातर्फे टी-शर्ट देण्यात येणार आहेत. तसेच सलग चार षटकारासाठी राज कोकरे यांच्याकडून स्पोर्ट्स किट व बॅट देण्यात येणार आहे. सलग चार चौकारासाठी समाधान नरूटे यांच्याकडून स्पोर्ट्स किट व बॅट देण्यात येणार आहे. सलग तीन विकेट साठी विजय माने यांच्याकडून स्पोर्ट शूज देण्यात येणार आहेत. सर्वाधिक धावा घेणाऱ्या स्पर्धकासाठी गणेश भोसले यांच्याकडून बॅट देण्यात येणार आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या स्पर्धकासाठी राजनंदिनी स्पोर्ट सांगोला यांच्याकडून  किट व सॅक देण्यात येणार आहे .

 

या क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक संस्था व मान्यवरांकडून विशेष अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन देवा स्पोर्ट्स व राजमाता प्रतिष्ठान सांगोला यांनी केले आहे या स्पर्धा क्रीडा संकुल सांगोला येथे मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!