सांगोला तालुका
कोळा येथील महादेव आलदर यांचे निधन..

सांगोला तालुक्यातील कोळा येथील प्रगतशील शेतकरी महादेव नारायण आलदर यांचे निधन झाले . निधना समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते . त्यांच्या अचानक जाण्याने संत तुकाराम नगर कोळा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
सोना चांदीचे सुरेश आलदर, बिरूदेव आलदर, सृष्टी मेडिकलचे संस्थापक शहाजी आलदर, सोलापूर पोलीस संभाजी (सुखाहारी) आलदर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता कोळा येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.