वाघ आल्याचे भिती पसरविली; अदाखलपात्र गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला वनपरिक्षेत्र हद्दीमधील चिकमहूद येथील जाधववाडी परिसरात एका व्यक्तीने बनावट वाघाचा फोटो काढून रस्त्यावर दाखविला व जाधववाडी येथे वाघ आला आहे, असे मोबाईलवर स्टेटस ठेवले. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे त्याला चौकशीसाठी वन विभागाने ताब्यात घेतले तेव्हा त्याने जाधववाडी येथे अगोदर रस्त्याचा फोटो काढला नंतर मोबाईल वरून त्या रस्त्यावर वाघ आहे असा फोटो तयार केला. तो फोटो काही मित्रांना पाठवला व स्टेटसला ठेवला तो गुन्हा मला मान्य आहे असे लिहून दिले. त्याच्यावर सांगोला पोलीस स्टेशनमध्ये वनपाल सांगोला यांनी फिर्याद दिली व अदाखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. अदाखलपात्र अहवाल 2166/2023 भा.द.वि. कलम 290 प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. सदरची फिर्याद सुग्रीव मुंडे वनपाल सांगोला यांनी दिली आहे.
उपवन संरक्षण सोलापूर धैर्यशील पाटील, सहाय्यक वन संरक्षक बाबा हाके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये तुकाराम जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, एस.एल.मुंडे वनपाल सांगोला, एस.एल.वाघमोडे वनपाल जुनोनी, वनरक्षक केतन जाधव, गोवर्धन वरकडे, करांडे, इंगोले मॅडम यांच्यासह इतर वन कर्मचारी उपस्थित होते.
सांगोला तालुक्यातील लोकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या भागात वाघ नाही, कोठूनही आलेला नाही त्यामुळे गैरप्रकार केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. जनसामान्यात भीतीचे वातावरण पसरवू नये, असे आवाहन वनविभाग सांगोला तर्फे करण्यात आले आहे.