निरू भैय्या युथ फाऊंडेशन च्या निवेदनाने सार्वजनिक बांधकाम विभाग लागले कामाला

वाणी चींचाळे – निरू भैय्या युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन बळीराम गडहिरे यांनी 9 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग सांगोला यांना वाणि चिंचाळे ते वाढेगाव सांगोला (वाणी चिंचाळे – वाकी-आलेगाव -मेडशिंगी- वाढेगाव) या मार्गावर रस्त्यालगत असणारी दूतर्फी काटेरी दाट झाडे मुळासकट काढण्याबाबत निवेदन दिले होते,


दिवाळी सुट्ट्या संपताच सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या कामाला लागले आहे, वाढेगाव ते वाणी चिंचाळे या मार्गावरील एक साईड काटेरी झाडे मुळासकट काढल्याचे त्याच बरोबर रस्त्यावर खड्डे पडलेल्या ठिकाणी खडी टाकलेली दिसल्याने प्रशासनाने दिलेला शब्द पाळला व नागरिकांच्या जीवावर प्रवासादरम्यान धोका असणाऱ्या काटेरी झाड्या या मुळासकट काढन्याचे काम प्रगती पथावर सुरू असल्याने आता अपघाताचे प्रमाण नक्की कमी होणार व प्रवास सुखकर होणार या कारणाने नागरिक खूप खुश आहेत व सर्वत्र संबंधित विभाग व फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक होत आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. निरंजन बळीराम गडहिरे म्हणाले की लवकरच रस्त्याच्या दोन्ही साईडची सर्व काटेरी झुडपे काढल्यानंतर बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान निरू भैय्या युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात येईल, यापुढील काळात अश्याच अनेक सामाजिक, शैक्षणिक व विधायक कामासाठी निरू भैय्या युथ फाऊंडेशन नेहमी पुढाकार घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवेल असे आश्वासन दिले.