खारवटवाडी येथील किसन गेजगे यांचे दुःखद निधन —-

खारवटवाडी तालुका सांगोला येथील श्री किसन बापू गेजगे यांचे 21 नोव्हेंबर 2023 (मंगळवार ) रोजी पहाटे अल्पशा आजारपणामुळे दुःखद निधन झाले आहे .मृत्यूसमयी त्यांचे वय 70 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुले,चार विवाहित मुली असा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवारी सकाळी 7.30 वाजता खारवटवाडी(गेजगे वस्ती) येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.त्यांना परिसरात आमदार नावाने ओळखले जात होते.ते स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.