येत्या काळात सोशल मीडिया जागृत आणि बूथ कमिटी सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
सांगोला शहर आणि तालुका बूथ कमिटी व सोशल मीडिया विभाग प्रमुख युवकांची बैठक संपन्न

कार्यकर्त्यांमध्ये उर्मी आणि जिद्द असली पाहिजे. माझ्या आयुष्यात खूप मोठं नाही. पण तुमची साथ आणि आशीर्वाद हेच सर्वात मोलाची संपत्ती आहे. कार्यकर्ता हेच माझं भांडवल आहे.प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य म्हणून नातं जपले आहे. आज राजकारण समाजकारण करताना कार्यकर्त्यांच्या खिशाला कात्री लागू दिली नाही. प्रामाणिक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही भूमिका माझी असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कामाला लागलं पाहिजे येत्या काळात सोशल मीडिया जागृत आणि बूथ कमिटी सक्षम झाल्या पाहिजेत. त्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगोला शहर आणि तालुका बूथ कमिटी व सोशल मीडिया विभाग प्रमुख युवकांची बैठक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी युवा कार्यकर्त्यांना समुपदेशन करताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा युवकचे नेते सतीशभाऊ काशीद पाटील, तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे, युवक तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, युवकचे शहराध्यक्ष रवीदादा चौगुले, युवा नेते योगेशदादा खटकाळे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते दिलीप मोटे, शिवने गावचे लोकनियुक्त सरपंच दादासो घाडगे, ॲड. महादेव कांबळे, युवा उद्योगपती सूर्याजी खटकाळे, सतीशभाऊ पाटील यांच्यासह सांगोला शहर आणि तालुक्यातील बुथ कमिटीचे मेंबर, सोशल मीडिया विभाग प्रमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, राजकिय परिस्थिती कशी ही असली, सत्ता असली किंवा नसली तरी पदाधिकारी कार्यकर्ते यांना कधी झळ बसू दिली नाही. विकास कामांमध्ये खंड पडू दिला नाही. जनतेची सेवा प्रामाणिकपने केली. जात, धर्म, पक्ष पार्टी यापेक्षा आलेल्या माय भगिनी आणि वयोवृध्द नागरिक आणि तरुणांचे काम करत राहणं हे माझं ध्येय आहे. तालुक्यात असा पुढारी नाही की त्याचं काम मी केलं नाही. कोणाच्या वाळ्या पाचोल्यावर पाय दिला नाही. कोणाला काम करतो म्हणून नादी लावली नाही. स्व. काका आणि काकींनी दिलेले वृत्त घेवून समजाचे प्रश्न सोडावीत आहे. आणि अडचणीत असलेल्यांना मदत करण्याची भूमिका आज पर्यंतच्या काळात बजावली आहे.
ज्या ज्या वेळी काम करण्याची संधी उपलब्ध झाली त्या त्यावेळी त्या संधीचे सोने करून दाखवला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जयमालाताई गायकवाड यांनी 28 व्यां क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद 3 क्रमांकावर आणली. विधानपरिषद चे प्रतिनिधित्व करत असताना जिल्ह्याला समान न्याय दिला. मोठा निधी जिल्ह्याला मिळवून दिला. विधापरिषदेचा निधी ही असतो हे दाखवून देत सबंध जिल्ह्यात विकास कामांचा डोंगर उभा करून दाखविला आहे. तालुक्यातील बळीराजावर ज्या ज्या वेळेस संकट उभारली त्या त्यावेळी मदतीचा हात देण्याची भूमिका आणि बजावली आहे. पाणी, दूध दरवाढ, यापूर्वी चारा टंचाई असे एक ना अनेक प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. कोणावर टीका – टिप्पणी करण्यापेक्षा कुणाच्या प्रयत्नाने काम होतं हे तालुक्याला माहिती आहे. हे कोण्या जोतिशाने सांगायची गरज नाही. मी गावात काय केलं, मला काय करावे लागेल याची शिदोरे घेवून कार्यकर्त्यांनी जायचं आहे. गावामध्ये काम करत असताना कोणी नादलाच लागले नाही पाहिजे असं काम कार्यकर्त्यांनी गावात करायचं आहे. यासाठी मी कायमस्वरूपी तुमच्यासोबत असेल असा विश्वास मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील यांच्यासह सांगोला शहर आणि तालुक्यातील बुत कमिटी मेंबर व सोशल मीडिया विभाग प्रमुख सदस्यांनी देखील आपले यांनी आपले विचार व्यक्त केले.
आज पर्यंत तुमचा आदेश मानला – तुम्ही सांगितले ते केलं, मात्र आज 2024 ला आता आमचं ऐकावे लागेल. आता माघार नाही. विधानसभा निवडणूक लढवावी ही असा एकमुखी ठराव घेत उपस्थीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील आग्रही मागणी लावून धरली. यावर मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल. सध्या कार्यकर्त्यांनी बुथ बांधणी – सोशल मीडिया सक्षम ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे त्यांनी सांगितले.