सांगोला तालुकामहाराष्ट्र

अनुसुचित जमातीचे (एसटी)आरक्षण धनगर समाजाला द्यावे

धनगर समाज सेवा मंडळाच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

सांगोला(प्रतिनिधी):-अनुसुचित जमातीचे (एसटी)आरक्षण धनगर समाजाला द्यावे अशी मागणी सांगोला येथील धनगर समाज सेवा मंडळाच्यावतीने तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे मंगळवार दि.21 नोव्हेंबर रोजी निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी करण्याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी धनगर बांधवानी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकाने धनगर समाजाला 50 दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले, 50 दिवसात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्याने धनगर समाजाला शासन निर्णयाव्दारे अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले त्या चार राज्यांचा सदर समिती भेट देवून अभ्यास करुन महाराष्ट्रात धनगर समाजाला शासन निर्णय काढून आरक्षण अंमलबजावणी करण्याचे अभिवचन दिले होते.
परंतू शासनाने दिलेला 50 दिवसाचा अवधी संपुन वरील प्रमाणे शासनाने दिलेला शब्द फिरवल्याने व सदर अवधीत काही प्रयत्न केल्याचे दिसून येत नसल्याने धनगर समाजाची शासनाने घोर फसवणूक केल्याचे निदर्शनास येते. तेव्हा धनगर समाजाचा विश्वासघात करणार्‍या या शासनाचा निषेद करण्यात येत असुन ताबडतोब महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र राज्यात धनगर समाज यापुढे तिव्र आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत असून त्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहिल. तेव्हा शासनाने याबाबतची दखल घेवून त्वरीत अंमलबजावणी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी बाळासाहेब एरंडे, दादासाहेब लवटे, किरणभाऊ पांढरे, प्रशांत वलेकर, अ‍ॅड.धनंजय मेटकरी, विष्णू देशमुख, उल्हास धायगुडे, धनंजय मस्के, अनिल खरात, अरविंद वलेकर, पोपट गडदे, दिलीप जानकर, दत्तात्रय जानकर, रमेश अनुसे, ज्ञानेश्वर इमडे, प्रशांत इमडे, बालाजी येडगे, दादासाहेब बुरुंगले, विनायक दोलतडे, अनिकेत वाघमोडे, राजेंद्र हजारे, प्रसाद लवटे, देविदास गावडे, सतिश पडळकर, सागर मेटकरी, सुरज हजारे, बलभिम एरंडे, गोरख पांढरे, रोहन पिंजारी, अनिल सरगर, केराप्पा पांढरे, विक्रम सरवते, भाऊसो घुटुकडे, आप्पासाो लोकरे, विशाल जानकर, प्रविण जानकर, विनोद बोरकर, विलास कबाडे, समाधान येडगे, नितीन पडळकर, विशाल मदने, रवि मेटकरी, केतन शेळके, योगेश देवकुळे, यांच्यासह सांगोला तालुका सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!