सांगोला तालुकाक्रीडाराजकीय

ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचे डॉ .बाबासाहेब देशमुख व सागर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

मान्यवरांच्या उपस्थितीत ओम आनंदा माने यांचा वाढदिवस साजरा

सांगोला/ प्रतिनिधी :सांगोला नगरपालिकेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने व माजी नगरसेवक आनंदा माने यांचे चिरंजीव ओम माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार 21 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या नगराध्यक्ष चषक 2023 भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख व युवा सेना जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रीडा संकुल सांगोला येथे करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, माजी उपनगराध्यक्ष सुरेशआप्पा माळी ,माजी नगराध्यक्षा राणीताई माने, युवा सेना तालुका अध्यक्ष दीपक खटकाळे, धनगर समाज सेवा मंडळ माजी अध्यक्ष काशिलिंग गावडे, माजी जि.प सदस्य अतुल पवार, माजी नगरसेवक माऊली तेली, माजी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख, धनगर समाजसेवा मंडळ अध्यक्ष दिलीप जानकर, उद्योगपती बाळासाहेब गावडे, चेअरमन तायप्पा माने, शिवसेना तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटे, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी, माजी नगरसेवक गजानन भाकरे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर जाधव, धनगर समाजसेवा मंडळ माजी अध्यक्ष दत्ताभाऊ जानकर , पी.एस.आय. सुधीर पलसे, धनगर समाजसेवा मंडळ माजी अध्यक्ष नवनाथ शिंगाडे, उद्योगपती महेश कदम, उद्योगपती प्रशांत गावडे, ॲड .भारत बनकर, प्राध्यापक बाळासाहेब घोरपडे, इंजिनियर दिनेश येडगे, स्वप्निलभैया बाबर ,ज्ञानेश्वर गाडेकर, कीर्तीपाल बनसोडे, अरुण पाटील ,समीरदादा पाटील, प्रवीण नवले, सुनील धतिंगे, जमीर मुजावर गुरुजी ,उद्योगपती अनिल शिरसागर, इंजिनिअर सागर आवताडे, इंजिनिअर आकाश म्हेत्रे, राज कोकरे , रणजीत बनसोडे, कशिलिंग गाडेकर ,अमित जाधव ,अण्णा गडदे, कुणाल माने, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ओम आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला.

राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक आनंदा भाऊ माने हे कार्यक्रमाचे निमंत्रक होते .या क्रिकेट सामन्याचे आयोजक देवा स्पोर्ट्स व राजमाता प्रतिष्ठान सांगोला हे आहेत. या क्रिकेट स्पर्धेचे समालोचन राज वाघमारे हे करत आहेत तर अक्षय जाधव ओंकार गरंडे हे गुणलेखनाचे काम पाहतात.पंच म्हणून अमित जाधव आसिफ मुजावर ,ओंकार परचंडे, विशाल घुटुकडे काम पाहत आहेत
उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी पहिला सामना दोस्ती स्पोर्ट्स व राम रहीम स्पोर्ट सांगोला यांच्यात खेळण्यात आला.या सामन्यांमध्ये राम रहीम स्पोर्ट संघ विजयी झाला .या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन माधुरी चव्हाण इंदापूर व राज वाघमारे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!