सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

गद्दाराना गाडल्याशिवाय  महाराष्ट्र  शांत बसणार नाही- राहुल चव्हाण पाटील

आलेगाव येथे होऊ द्या चर्चा" या कार्यक्रमाचा समारोप

सांगोला :-  महाराष्ट्राच्या  मातीत  गद्दारीचे बीज उपजत नाही हा आजवरचा इतिहास असून महाराष्ट्रातील जनता गद्दारांना गाडून पुन्हा ऐकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान करेल  असा विश्वास शिवसेना माढा लोकसभा निरिक्षक राहूल चव्हाण पाटील यांनी व्यक्त केला. ते सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या समारोप सभेत बोलत होते.  

राहूल चव्हाण पाटील म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील  प्रत्येक तालुक्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे.जनतेला पिण्यासाठी पाणी नाही,शेतीसाठी पाणी नाही.रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे.शासकीय आरोग्य रुग्णालय अस्वच्छ आहेत. या लोकसभेचा खासदार कोण हे जनतेला माहिती नाही.गेल्या नऊ वर्षापासून केंद्रातील भाजप सरकाने देशातील जनतेचं वाटोळं केलं आहे.या सरकारने गेल्या नऊ वर्षात फक्त आश्वासनांचा भडिमार केला आहे. जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेठीस धरले आहे. असा हल्लाबोल केला .

सांगोला तालुक्यात 5 स्टार MIDC होणार होती त्याचे काय झाले…? डाळींब संशोधन केंद्र सांगोल्यात होणारं होते काय झालं..? तरुणांना रोजगार मिळणार होता काय झालं…?या तालुक्यातील आमदाराने फक्त जनतेला विकासच गाजर देण्याचं काम केलं व जनतेसाठी आलेला निधी टक्केवारी ठरवून स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठ करण्याचं काम सुरू केलं आहे. सांगोला तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. या स्थानिक प्रश्नावर त्यांनी जनतेचे लक्ष केंद्रित करत गद्दार आमदार शहाजी पाटील याचा देखील समाचार घेतला.

तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले का ? महागाई कमी होणार होती काय झालं? राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे काय झाले? रुग्ण मरत आहेत? या सरकारने ना छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्राचे स्मारक केले ना बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक केले,फक्त घोषणा केल्या अंमलात मात्र काही आणले गेले नाही.त्यामुळेच हे लबाडांचे सरकार म्हणावे लागेल  असे सांगत केंद्र सरकार च्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड चव्हाण यांनी केला.

यावेळी माजी तालुकाप्रमुख गुलाबराव बाबर, हारीभाऊ पाटील, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सरगर मॅडम, शिवसेना तालुका समन्वयक भारत मोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, कॉलेज कक्षाचे उपाध्यक्ष ॲड समाधान दिवसे, युवासेना तालुका समन्वयक शंकर मेटकरी, श्रीधर बापू यादव, शहरप्रमुख सौरभ चव्हाण, गणेश घाडगे, गोरख येजगर, समाधान चव्हाण, नामदेव सरगर, सचिन वाघमारे, ओम माने यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी,पदाधिकाऱ्यांसह वाकी, मेडशिंगी, चिंचाळे, मानेगाव, कमलापुर, हातीद, हटकर मंगेवाडी, जूजारपुर, घेरडी, आलेगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!