यंदाच्या दिवाळीत सांगोला अगारास १ कोटी ५५ लाख १३ हजार उत्पन्न

सांगोला ( प्रतिनिधी):- यंदाच्या दिवाळीत प्रवाशांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळे सांगोला अगारास वाहतुकी तून १ कोटी ५५ लाख १३ हजार उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार प्रमुख विकास पोफळे व स्थानक प्रमुख सागर कदम यांनी दिली.
यंदा दीपावली मधे एस टी महामंडळाने ९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान दरवर्षी प्रमाणे १० टक्के भाडेवाढ केली जाते त्यामुळे यंदा एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झाला आहे. २० नोव्हेंबर अखेर एसटी महामंडळाच्या सांगोला आगारातून ५६ एस टी बसेसनी लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागात २ लाख ८९ हजार किलोमीटर प्रवास केला यामधून सांगोला आगारास १ कोटी ५५ हजार १३ लाख एवढे विक्रमी उपन्न मिळाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या भाडेवाढीत संपुर्ण राज्यात १० टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही प्रवाशांनी एसटीकडे पाठ न फिरवता चांगला प्रतिसाद दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठांना आणि महिलांना तिकीटदरात ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीसाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडून जादा बस फेऱ्या चालवण्यात आल्या. त्या गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे ९ ते २० नोव्हेंबर दरम्यान एसटीचे उत्पन्न वाढले असल्याचे आगार प्रमुख विकास पोफळे व स्थानक प्रमुख सागर कदम यांनी सांगितले.