शिवणे विद्यालयात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे,नूतन पोलीस कॉन्स्टेबल चैतन्य पलसे,माधुरी इंगोले यांचा सत्कार संपन्न

शिवणे वार्ताहर-शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रत्येक शनिवार हा ‘संस्कारवार’ म्हणून साजरा केला जातो .त्याचाच एक भाग म्हणून या दर शनिवारी योगा, संस्कार कथा,व्याख्याने,घेतली जातात त्याच कार्यक्रमामध्ये प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांना नुकताच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ ,मुंबई यांनी गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार फैजपूर येथे सन्मानपूर्वक दिला.त्याबद्दल त्यांचा सत्कार विद्यालयाच्या तर्फे करण्यात आला तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी चैतन्य पलसे व माधुरी इंगोले यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली त्याबद्दल त्यांचाही सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला.तसेच विद्यालयातील गुणी मुलगी कु.ऋतुजा इंगोले हिची सोलापूर जिल्हा खो खो संघात निवड होऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला वरील सर्वाना मानाचा फेटा बांधून,पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
नूतन पोलिसांनी अत्यन्त प्रतिकूल परिस्तिथी मध्ये शिक्षण घेऊन हे यश संपादन केले आहे असे उद्गार प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांनी काढले तसेच त्यांना मिळालेला पुरस्कार सर्व हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छा मुळे मिळाला असून तो त्यांनाच अर्पण केला .व सर्व विध्यार्थानी कोणतातरी आदर्श समोर ठेऊन शिक्षण पूर्ण केले पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.राजाभाऊ कोळवले यांनी केले तर आभार प्रा.कामदेव खरात यांनी मानले.