मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या सांगोला तालुका शहराध्यक्षपदी मोहसीन मुलाणी तर शहर उपाध्यक्षपदी हाजी महंमदगौस नाडेवाले यांची निवड !

मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सर्व समाजातील युवाशक्ती संघटन करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून सर्व समाजास सहकार्य करत असते अशाच सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली व सांगोला तालुका अध्यक्ष इम्रानखान मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समन्वय समितीच्या सांगोला शहराध्यक्षपदी मोहसीन मुलाणी तर सांगोला शहर उपाध्यक्ष पदी हाजी महंमदगौस नाडेवाले यांची निवड करण्यात आली.
मुस्लिम समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व समाजिक शक्ती संघटित करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवून सर्व समाजास सहकार्य व सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा मुस्लिम समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष रशीद भाई शेख यांनी व्यक्त करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
——————————
मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवून माझी शहराध्यक्षपदी निवड केली त्यांच्या या विश्वासाला पात्र राहून मी सर्वपरीने सर्व समाजाच्या अडीअडचणी सर्वाना सोबत घेवून सोडविण्याचा प्रयत्न करेन.
– नूतन अध्यक्ष मोहसीन मुलाणी