*लायन्स सोलापूर सिटी क्लबला झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण यांची भेट*

सांगोला ( प्रतिनिधी ) समाजाला प्रेम आणि विश्वास देऊन जगातील १६६ हून अधिक स्वतंत्र देशात २८५०० पेक्षा जास्त शाखा असणाऱ्या लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवाकार्यात सुसूत्रता यावी यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्जने बहूप्रांत,प्रांत, रिजन, झोन व क्लब अशी रचना करून विविध कार्यक्रमाचे स्वरूप ठरविले आहे.त्यानुसार प्रांत ३२३४ ड१ रिजन १ झोन ५ मधील लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी या क्लबला झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी अधिकृत भेट दिली.
या अधिकृत भेट कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर सिटी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.मोहन भूमकर यांनी घंटानाद व ध्वजवंदन करून केली.यावेळी क्लबचे पदाधिकारी, सदस्य व सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष ला.भूमकर यांनी प्रास्ताविकामध्ये झोन चेअरमन अधिकृत भेट हेतू विषद करत उपस्थितांचे स्वागत केले व सोलापूर सिटी क्लबचा प्रशासकीय व सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला व झोन चेअरमन ला. प्रा.धनाजी चव्हाण यांचा शाल ,बुके व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला.यावेळी बोलताना प्रा.चव्हाण यांनी अध्यक्ष ला.मोहन भूमकर व पदाधिकारी, सदस्य यांच्या माध्यमातून सोलापूर सिटी क्लबच्या प्रशासकीय व सेवाकार्याचा गौरव करत अन्नदान सेवाकार्याचे विशेष कौतुक केले.व या पुढे समाजाच्या अभ्युदयासाठी होणाऱ्या क्लबच्या सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.