वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या वतीने माढेकर महाराज मठ येथे साहित्य वाटप*

वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्या वतीने माढा येथील श्री.ष.ब्र.१०८ प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज मठ येथे वेदपाठ शिकणाऱ्या शिष्यांना चादर २० नग,सतरंजी २० नग, तेल १ डबा,५ किलो शेंगदाणे व ५ किलो साखर देण्यात आली.
यावेळी श्री.ष.ब्र.१०८ प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराजांनी सांगोल्यातील समाज बांधवांना शुभ आशीर्वाद दिले व आलेल्या सदस्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला यावेळी महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे सदस्य काशिनाथ ढोले संतोष महिमकर , प्रसाद जिरगे ओंकार उकळे ,औदुंबर लोखंडे व राजवर्धन ढोले उपस्थित होते