sangola
प्रशांत लवटे हे राज्यस्तरीय ग्रामविकास रत्न पुरस्काराने सन्मानित
सांगोला शहरातील.आयुर्विमा कंपनीचे अधिकारी व धनगर समाजाचे कार्यकर्ते प्रशांत लवटे यांना नुकतेच.राज्यस्तरीय ग्रामविकास रत्न 2023 या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ईगल फाउंडेशनचे वतीने पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सदर पुरस्कार लवटे यांना आमदार रामहरी रुपनर यांच्या शुभ हस्ते व पणन उपयुक्त सुभाष घुले, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीणजी काकडे ,प्राचार्य डॉ.कैलास करांडे, किशोरभाई भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्रशांत लवटे हे सांगोला येथे आयुर्विमा कंपनी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत असून.यूवकाना मार्गदर्शन व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना आयुर्विमा कंपनी कडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रशांत लवटे हे सांगोला येथे आयुर्विमा कंपनी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत असून.यूवकाना मार्गदर्शन व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना आयुर्विमा कंपनी कडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रशांत लवटे हे सिंहगड इन्स्टिट्यूट कमलापुर चे शिक्षक- पालक असोसिएशन चे उपाध्यक्ष तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष असून महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. ईगल फौंडेशनने त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सदर पुरस्कार प्रदान केला आहे.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.