कोळा शिवेचीवाडी येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
स्व किसनराव कोळेकर पंच यांनी आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली~ डॉ बाबासाहेब देशमुख

कोळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते स्वर्गीय किसनराव कोळेकर यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त नवीन तरुणांना ऊर्जा मिळण्यासाठी कोळा शिवेचीवस्ती ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून कौतुकास्पद कार्य केले असुन स्वर्गीय किसन पंच यांनी आयुष्यभर आबासाहेबांचे नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे शेवटपर्यंत गोरगरीब लोकांपर्यंत तळागाळापर्यंत काम केले ते कधीही विसरू शकणार नाही आयुष्यभर त्यांनी गोरगरिबांची सेवा केली असल्याचे विचार शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
कोळा शिवेचीवस्ती ता सांगोला येथे स्वर्गीय किसनरावजी कोळेकर पंच यांच्या पुण्यतिथी निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे तसेच स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख,स्वर्गीय भाई जगन्नाथरावजी कोळेकर, स्वर्गीय किसनरावजी कोळेकर पंच यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करून मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या वेळी नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले कोळ्या सारख्या ग्रामीण भागातील वाड्यावर स्वर्गीय किसनराव कोळेकर पंच यांनी आबासाहेबा यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब जनतेच्या अडचणी सोडवल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं भविष्य काळात सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. या भागातील युवकांनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून चांगलं गौरवास्पर्ध काम केलं आहे सर्वांचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो असे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
व्यासपीठावर कोळा गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर (पुढारी), माजी जिल्हा परिषद सदस्य भाई गजेंद्र कोळेकर, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर,पत्रकार जगदीश कुलकर्णी, कुंडलिक आलदर दिलीप देशमुख, सरपंच प्रतिनिधी हरी सरगर, मारुती सरगर, रफिक भाई तांबोळी, समाजसेवक सोपान कोळेकर,किडबिसरी सोसायटीचे चेअरमन अरुण आबा घेरडे, लोकसेवक ईश्वर घाडगे, अरुण बजबळकर नाथा घेरडे, सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते माजी सदस्य स्वर्गीय किसनरावजी कोळेकर (पंच) यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या हजारो लोकांनी सहभाग नोंदवला होता विजेत्यांचा सत्कार मेडल ट्रॉफी बक्षीसे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते देण्यात वितरण करण्यात आले
शिवेचीवाडी कोळा किसनरावजी कोळेकर युवा मंचच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते या मध्ये खुला गट पुरुष १० किमी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मेडल व ट्रॉफी आर्यन चौगुले तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अमोल आमुने यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस चैतन्य रुपनर चतुर्थ बक्षीस दादा कोळेकर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रोहित सूर्यवंशी यांनी पटकाविले
त्याचप्रमाणे मुलीं खुला गट ५ किमी अंतरामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मेडल ट्रॉफी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती सानिका रुपनर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस स्नेहल खरात तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस सानिका ऐवळे व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अक्षदा होळकर व पाचवा सानिका शिंदे यांना मिळाले त्याचप्रमाणे १७ वर्षाखाली वयोगटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी मेडल सुशांत सरगर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अनिकेत देशमुख तृतीय क्रमांकाचे बक्षीस विशाल वाघमोडे यांना मिळाले या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांचे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले सर्वांना शुभेच्छा देण्यात आले मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किसनराव कोळेकर युवा मंच शिवेवस्ती सर्व ग्रामस्थ युवक वर्ग सर्वांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक भाई गजेंद्र कोळेकर आभार अजित कोळेकर रमेश कोळेकर पंच यांनी केले.
कोळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य स्वर्गीय किसनराव कोळेकर पंच यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोंबडवाडी येथे घरी समाधी स्थळावर डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी अभिवादन केले.