सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

कोळ्याच्या अथर्व कुलकर्णीने गावाचे नाव मोठे केले~ॲड सचिन देशमुख

कोळा गावचे प्रसिद्ध डॉ सौ राजश्री डॉ श्रीकांत भिकाजी कुलकर्णी यांचे चिरंजीव अथर्व कुलकर्णी यांची इंग्लंड देशात  नॉर्दर्न आयर्लंड  बेलफास्ट विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्स एम एस उच्च शिक्षण यशस्वी रित्या पूर्ण  करून मायदेशी परतला त्याचे कार्य कौतुकास्पद गौरवास्पद अभिमानास्पद आहेच त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो अभिनंदन करतो त्याने आई वडिलांचे परिवाराचे गावाचे नाव मोठे केले असल्याचे विचार कोळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य ॲड सचिन देशमुख यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथे अथर्व कुलकर्णी आयर्लंड देशातून उच्च शिक्षण घेऊन गावी परतला यावेळी त्याचा निवासस्थानी शाल श्रीफळ फेटा देऊन ॲड जि प सदस्य सचिन देशमुख व कुलकर्णी परिवाराच्या इतर मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी  ॲड देशमुख बोलत होते यावेळी नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सचिन देशमुख म्हणाले आयर्लंड सारख्या देशात शिक्षण पूर्ण करून चांगले कार्य केले आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावयास हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे अथर्व आहे गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटतो असे ॲड देशमुख यांनी सांगितले.
कोळा नगरीत अथर्व कुलकर्णी यांचे कोळे गावात आगमन झाल्यानंतर फटाक्याच्या आतष बाजीत हलगीच्या निनादात पेढे वाटून फुलांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमास जिप सदस्य सचिन देशमुख उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, पत्रकार जगदीश कुलकर्णी, उद्योगपती दिलीप देशमुख, उद्योगपती विनायक शेटे, सरपंच प्रतिनिधी हरिभाऊ सरगर,सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे,महेश ओतारी मलिकार्जुन कोंपे, प्रगतशील बागायतदार काशिनाथ आलदर, सत्यम आलदर राजू सरगर सुभाष शेटे कुंभार मेजर विकी माने,अनिकेत पोरे शंकरराव गोरड निखिल ओतारी यांच्यासह मित्रपरिवार युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी प्राचार्य विलास कुलकर्णी सर, माजी डेप्युटी इंजिनिअर राजेंद्र कुलकर्णी, सुपरवायझर रमाकांत कुलकर्णी एडवोकेट सचिन कुलकर्णी,जगदीश कुलकर्णी, डॉ वैभव कुलकर्णी विनायक कुलकर्णी सौ भावना कुलकर्णी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी डॉ राजश्री कुलकर्णी  यांनी परिश्रम घेतले. उपस्थित त्यांचे स्वागत आभार जगदीश कुलकर्णी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!