प्रशासकीय विभागातील सांगोला तालुक्यातील अधिकार्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
सांगोला(प्रतिनिधी):- महाराष्ट्रात विविध प्रशासकीय विभागात क्षेत्रात कार्यरत असणार्या सांगोला तालुक्यातील अधिकार्यांचा दीपावलीचे औचित्य साधून स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत मराठी अक्षरे गिरवून जिद्द ,चिकाटी मेहनत ’महत्वाकांक्षा व अफाट इच्छा शक्ती च्या जोरावर महाराष्ट्राच्या प्रशासनात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात प्रशासकीय सेवा बजावत सांगोला तालुक्याची प्रशासकीय तालुका म्हणून ओळख निर्माण निर्माण केली व करीत आहे .अशा प्रशासकीय सेवा बजावणार्या सांगोला तालुक्यातील रत्नांचा -प्रशासकीय अधिकार्यांचा स्नेह मेळावा सांगोला शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
या स्नेह मेळाव्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी श्री .माणिकराव भोसले साहेब (धायटी ), सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री शंकरराव जाधव (मेडशिंगी) व सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र कांबळे ( मेथवडे) यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. .
स्नेहमेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पुजनाने करण्यात आली .कार्यक्रमाच्या सुरुवातीला माणगंगा परिवाराचे संस्थापक व कर्नाटक बँकेचे वरिष्ठ मॅनेजर श्री .नितीनजी इंगोले यांनी प्रस्ताविक केले. प्रास्ताविकां मध्ये इंगोले साहेबांनी या स्नेह मेळाव्याचे उद्देश सांगून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सांगोला तालुक्यातील अभ्यासू , गरीब , होतकरू विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना अभ्यासिका ग्रंथालय व उपस्थित मान्यवर अधिकार्यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिर प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये निवड झालेले श्री .राहुल नकाते (अकोला), उपविभागीय कृषी अधिकारी श्री वैभव खटकाळे (अकोला) उपविभागीय कृषी अधिकारी कु .संध्याराणी सावंत (लोटेवाडी), उपविभागीय कृषी अधिकारी कु .धनश्री मिसाळ (पाचेगाव), उपविभागीय अधिकारी जलसंपदा श्री .वैभव खराडे (वाढेगाव), पशुसंवर्धन अधिकारी अधिकारी .श्री प्रथमेश माने (अकोला), तालुका कृषी अधिकारी कु .प्रतिक्षा नवले (एखतपुर), तालुका कृषी अधिकारी कु .सृष्टी खटकाळे (अकोला), कृषी अधिकारी श्री निलेश इंगळे (कडलास), राज्य कर निरीक्षक .श्री शरद गोडसे (लक्ष्मी नगर), राज्यकर निरीक्षक व डॉ.अशोक शिंदे सर यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्द उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांगोला गौरवरत्न म्हणून पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी श्री दादासाहेब कांबळे, श्री समाधान घुटूकडे, निलेश कदम , श्री अनिल घेरडीकर , राजेंद्र यमगर, श्री समाधान केदार, श्री समाधान खटकाळे, श्री संतोष खांडेकर, श्री .सुधाकर लेंडवे, श्री संजय नरळे, श्री अनिल लिगाडे, श्री प्रकाश बंडगर, संतोष भोसले, श्री महेश पांढरे, श्री .बजरंग जाधव, श्री सुधाकर चंदनशिवे, महादेव लवटे, श्रीमती जयश्री खंडागळे, श्री अमित म्हैत्रे, श्री .धनपाल गुरव, अनिल काळेल, श्री शरद गोडसे, श्री प्रदीप पाटील, श्री उल्हास इंगोले, राहुल खंडागळे, डॉ.प्रमोद बाबर, डॉ . प्रमोद गव्हाणे, डॉ .विक्रम शिंदे, डॉ .समाधान साळुंखे, श्री .बाळासाहेब लांडगे, दत्तात्रय हाके , श्रीमती संगीता निरफळ खंडागळे, श्रीमती स्वाती खटकाळे, श्री संजय सकट, श्री .संजय इंगळे, श्री. अशोक इंगोले, श्री विशाल भगरे, सुनिल जाधव, श्री सचिन शिंदे, श्री शिवाजी भुजबळकर, श्री युवराज केदार, श्री नितीन बाड, श्री वैभव चांडोले, श्री उत्कर्ष केदार, श्री डी.जे लिगाडे, श्रीअमोल इंगळे, डॉ.महेश इंगवले आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
तसेच स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार व्यासपीठ निर्माण झालेले असून ज्या माध्यमातून आपण तालुक्य साठी विधायक असे कार्य करू असे सर्वांनी आपल्या संवादामध्ये मत व्यक्त केले .त्याचप्रमाणे सहाय्यक नगर विकास रचनाकार श्री बंडगर साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा तिहेरी संगम म्हणजे मनुष्याचे जीवन आहे . तेव्हा उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्य करत असताना आपण पदाचा अहंकार न बाळगता सामान्य जनतेची आपल्या पदाच्यामाध्यमातून सेवा करावी व त्यातून आपण आपले सर्वांशी ऋणानुबंध निर्माण केले पाहिजे असे मत व्यक्त केले .
स्नेह मेळाव्यासाठी माणगंगा को -ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसा.चे मॅनेजर श्री अक्षय मुडे , स्टाफ कर्मचारी गणेश सावंत, संतोष सावंत, ऐवळे यांनी विशेष परिश्रम घेतले . सूत्रसंचालन श्री उत्कर्ष चंदनशिवे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.श्रीधर शेजवळ यांनी मानले .
स्नेहमेळावा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रम समन्वयक म्हणून श्री.नितीन इंगवले , डॉ .अशोक शिंदें सर, उत्कर्ष चंदनशिवे, श्री.बाळासाहेब सावंत, श्री.श्रीधर शेजवळ सो यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.