सांगोला विद्यामंदिर एन सी सी विभागातर्फे एन सी सी दिवस स्वच्छता अभियानाने संपन्न…
![](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231126-WA0010-780x470.jpg)
26 11 2023 रोजी एनसीसी दिवस औचित्य साधून 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्या अंतर्गत कार्यरत सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एनसीसी विभागाचे प्रमुख सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी व थर्ड ऑफिसर उज्वला कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
सांगोल्याची ग्रामदेवता श्री अंबिका देवी मंदिरामध्ये आजच्या दिवसाचे औचित्य साधून दीपोत्सव साजरा होणार होता त्यानिमित्ताने व एन सी सी दिवसाच्या निमित्ताने सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या एनसीसी कॅडेटस् नी मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला यावेळेस एनसीसी चे 90 कॅडेटस् उपस्थित होते.
हा उपक्रम राबवण्यासाठी 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम डी मुथ्थप्पा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल विक्रम जाधव सुभेदार मेजर अरुण कुमार ठाकूर सुभेदार अण्णासाहेब वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.
![Simply Easy Learning](https://mandootexpress.com/wp-content/uploads/2024/07/Add-a-heading.jpg)