सांगोला महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी मिळविले सुवर्णपदक

३८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर यांच्या वतीने वार्षिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात करण्यात आले होते. या शिबिरात सांगोला महाविद्यालयातील 03 मुली व १६ मुले छात्र सहभागी झाले होते. दहा दिवसांच्या निवासी शिबिरामध्ये छात्रांना ड्रिल, फायर फायटिंग, वेपन ट्रेनिंग, फायरिंग, मॅप रीडिंग, सेक्शन फॉर्मेशन, पी. टी., योगा, वृक्षारोपण तसेच छात्रांना उपयुक्त अशा विविध विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
शिबिरादरम्यान छात्रांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील छात्रांनी सहभाग घेतला व उत्तम कामगिरी केली. फायरिंग या महत्त्वाच्या स्पर्धेत कॅडेट ऋषिकेश शिंदे यास सुवर्णपदक, सार्जेंट रितेश बुवा यास रजत पदक तर कॅडेट अजय नळे यास ब्रांझ पदक मिळाले. गार्ड ऑफ ऑनर स्पर्धेत महिला कॅडेट सोनाली घाडगे व कॅडेट सायली जाधव हिस सुवर्णपदक मिळाले. व्हॉलीबॉल क्रीडा प्रकारात सार्जेंट रितेश धनवडे व ज्युनिअर अंडर ऑफिसर ऋषिकेश खटकाळे यास सुवर्णपदक मिळाले. कंपनी कमांडर कॅप्टन संतोष कांबळे यांनी शिबिरामध्ये अल्फा कंपनीचे यशस्वी नेतृत्व केले, त्याबद्दल सुवर्णपदक व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
शिबिरामध्ये ३८ महाराष्ट्र बटालियानचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. डी. मुत्तप्पा, ए. ओ. कर्नल देवानंद, सुभेदार मेजर ठाकूर, ट्रेनिंग जे. सी. ओ. अण्णाराव वाघमारे सर्व पी.आय. स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष मा.श्री.तात्यासाहेब केदार, उपाध्यक्ष मा.श्री.प्रा.पी.सी. झपके, खजिनदार मा.श्री.नागेश गुळमिरे, सचिव मा.श्री.अॅड.उदय(बापू )घोंगडे, सहसचिव मा.श्री.साहेबराव ढेकळे, माजी सचिव श्री. म. सि. झिरपे, कार्यकारिणी निमंत्रित सदस्य मा. श्री सुरेश फुले व सर्व संस्था सदस्य, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, कार्यालयीन अधीक्षक श्री विलास माने यांनी यशस्वी छात्रांचे अभिनंदन केले.



