बाळकृष्ण माऊली मंदीरात भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीचे आयोजन

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली यांचे परमप्रिय शिष्य श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात शुक्रवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ठिक दहा वाजता मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या हस्ते विणापुजन व ग्रंथांचे पुजन करुन होणार आहे.तसेच पारमार्थिक व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. सायंकाळी ठिक सहा वाजता पालखीची नंदेश्वर गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.रात्री किर्तनसेवा व जागर होईल.
शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी ठिक सात वाजता पूजा,नऊ वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम होईल व ठिक अकरा वाजता श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांचे प्रवचन होईल व दुपारी ठिक बारा वाजता पुष्पवृष्टी होऊन महाप्रसादानंतर श्री समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज यांच्या दहाव्या पुण्यतिथी सोहळ्याची उत्साहात सांगता होणार आहे.तरी सर्व गुरू बंधु-भगीनींनी या पुण्यतिथी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देवसागर साधक समाज नंदेश्वर यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.