तहसील कार्यालय सांगोला व पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन कर्मयोगी अंतर्गत जिल्हा कर्मयोगी चे प्रशिक्षण सुरू

तहसील कार्यालय सांगोला व पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन कर्मयोगी अंतर्गत जिल्हा कर्मयोगीचे प्रशिक्षण सांगोला येथे सुरू आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी मनीषा अव्हाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा उपविभागीय अधिकारी श्री बी. आर. माळी, तहसीलदार श्री संतोष कणसे व गटविकास अधिकारी श्री आनंद लोकरे यांनी नियोजन केले आहे. सदर कार्यक्रम हा तहसील कार्यालय सांगोला व पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त मानातून होत आहे.
केंद्र सरकार यांचा महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे मिशन कर्मयोगी ज्यामध्ये ग्रामीण पातळीवर कामाची कार्यकक्षा रुंदीवणे हा मिशन कर्मयोगीचा प्रमुख उद्देश आहे. सदर उपक्रमा साठी ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक ,आरोग्य सेवक/ आरोग्य सेविका, विजतंत्र कर्मचारी/ जनमित्र ,कालवा निरीक्षक पशुधन अधिकारी या सात संवर्गातील अधिकारी/ कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे
सदर प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व इल्युमिन संस्था यांच्या वतीने प्रथम तालुक्यातून सात मास्टर ट्रेनर ( ज्यामध्ये एक तलाठी, दोन ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, एक कालवा निरीक्षक, एक कृषी सहायक, एक आरोग्य सेविका व एक आरोग्य सेवक) यांना प्रशिक्षण देऊन ते सात मास्टर ट्रेनर तालुक्यातील सर्व वरील नमूद ग्रामस्तरीयअधिकारी/ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. सदर प्रशिक्षण हे तालुक्यातील 257 कर्मचारी/ अधिकारी यांना देण्यात येत असून त्यांची एकूण आठ बॅचमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक बॅच मध्ये 32 -33 कर्मचारी आहेत या प्रशिक्षणामुळे ग्राम पातळीवरील शासकीय सेवा देण्याची पद्धत सुधारल्या मुळे शासकीय कामाचा दर्जा उंचावणार आहे.
सदर प्रशिक्षण हे कमलापूर येथील सिंहगड संस्थेचे काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड कमलापूर तालुका सांगोला येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 यादरम्यान आठ बॅच मध्ये होणार असून प्रत्येक बॅचचे दोन दिवसाचे प्रशिक्षण होणार आहे.