पशुसंवर्धन विभागात निवड व जन्मदिनानिमित्त परिवर्तन फाऊंडेशन तर्फे संदीप होनमाने यांचा सत्कार संपन्न

सांगोला शहरातील संदीप बाळासाहेब होनमाने यांनी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या (स्टेनोग्राफर) पदासाठी दिलेल्या परीक्षेत २०० पैकी १६४ गुण मिळवत महाराष्ट्रात चौथा क्रमांक व एनटीसी प्रवर्गामधून पहिला क्रमांक मिळवला. यातून त्यांची वर्ग 3 स्तरावर पशुसंवर्धन विभाग लघुलेखक पदी निवड झाली. संदीप होनमाने यांचे संपूर्ण शिक्षण हे सांगोल्यात झाले. पुढील स्टेनोग्राफीच्या शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे गेले.
सदर स्टेनो परीक्षा ही 11 सप्टेंबर रोजी पार पडली. ही परीक्षा १३ जागेसाठी झाली असून यासाठी सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. सदर परीक्षेचा निकाल गुरुवारी २३ रोजी झाला. या परीक्षेसाठी संदीपने त्याच्या पालकांनी, शिक्षकांनी व स्वतः घेतलेल्या मेहनतीचे फळ केले. याची दखल घेत परिवर्तन फाऊंडेशन, सांगोला या संस्थेच्या सदस्यांनी दि. 29 नोव्हेंबर रोजी संदीपच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष ओंकार साळुंखे, सचिव संतोष महिमकर, सदस्य विजय खरजे, निलेश जानकर, सोमराज लवटे व संदीप यांचे कुटुंबीय उपस्थित होते.