सावे माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा.

सावे माध्यमिक विद्यालयात 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा करण्यात आला .यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन केले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.