सांगोला तालुकाआरोग्य

सचिन हॉस्पिटल मिरज येथे रविवारी मोफत वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग तपासणी शिबीर

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शहरातील सचिन हॉस्पिटलच्या वतीने गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांपैकी एक म्हणजे मोफत तपासणी शिबीर होय. हे शिबीर रविवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत होणार आहे. या शिबीरामध्ये वंध्यत्वाची कारणे, उपचार व स्त्रीरोग  यावर आधुनिक तंत्रावर तपासणी आणि मोफत सल्ला दिला जाणार असल्याची माहिती डॉ. सचिन सुगाणावर यांनी दिली.

सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुल न झालेल्या दाम्पत्यांना व fिस्त्रयांमधील विविध आजारांवर हॉस्पिटलच्या वतीने उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देत आहोत. असेही डॉ. सुगाणावर म्हणाले. हॉस्पिटलच्या वतीने आतापर्यंत राबविण्यात आलेल्या शेकडो मोफत शिबीरांमुळे हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. अपत्यहिन दाम्पत्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे व महिलांमधील आजारावर यशस्वी उपचार करण्याचे कार्य हॉस्पिटलकडून घडत आहे.
या शिबीराच्या माध्यमातून मुल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषा विषयी मार्गदर्शन व टेस्टटय़ूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येते. विशेषत गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या शुक्राणुंचे रोपण, वीर्यपेढी स्त्रीबीज दान, गर्भ गोठवून ठेवणे, आय.व्ही.एफ. आय.सी.एस.आय. आय.एम.एस.आय. व व्हेरिपिकेशन याचबरोबर बंद गर्भनलिका चालु करणे, स्त्रीबीज तयार न होणे यावर मार्गदर्शन करण्यात येते. पुरूष वंद्यत्वामुळे शुक्राणुमधील दोष संख्या कमी असणे, ताकद कमी असणे, शुक्राणु मृत असणे, लैगिक समस्या यावर आधुनिक उपचाराची व मायक्रोसर्जरीची माहिती या शिबीरात दिली जाते.

टेस्टटय़ूब बेबी व आय.यु.आय. तंत्रज्ञानामध्ये अनेक प्रकार असतात. स्त्री व पुरूषांमधील दोषानुरूप त्याची उपचारपध्दती निवडावी लागते. व त्याअनुषंगाने खर्च येत असतो. स्त्री आरोग्यामध्ये पाळीच्या गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाला सुज, पांढरे जाणे आदी गर्भाशय आजारावर दुर्बिनीद्वारे व तंत्रज्ञानाने आधुनिक उपचार करता येते. त्याचबरोबर कॅन्सर सारख्या आजारावर आधुनिक मशिनचा वापर करुन लवकर निदान व उपचार करणाऱया तंत्राविषयी माहिती दिली जाते. गर्भाशयाच्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रीयेची गरज असल्यास आधुनिक पध्दतीने व कमी खर्चामध्ये शस्त्रक्रीया करण्याची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमधील औषधोपचार व टेस्टटय़ूब बेबी या तंत्रज्ञानाने अपत्य प्राफ्तीचे भाग्य लाभले आहे. असेही डॉ. सचिन सुगाणावर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!