सांगोला तालुकामहाराष्ट्र

महिला दिनानिमित्त बनकरवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

क्रांतीज्योती महिला पंतसंस्था व लायन्स क्लब सांगोलाकडून आयोजन

सांगोला ( प्रतिनिधी ) जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती महिला नागरी पतसंस्था सांगोला तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त क्रांतीज्योती महिला नागरी पतसंस्था व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने व विजयसिंह लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांचे सहकार्याने सांगोला बनकरवाडी येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.या शिबिरामध्ये १२० रूग्णांची मोफत नेत्र तपासणी झाली.यापैकी १० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगली येथील आय हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले.

सुरुवातीला क्रांतीज्योती महिला नागरी पतसंस्थेचे चेअरमन भाग्यश्री बनकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले यावेळी मार्गदर्शक ला. प्रा.प्रबद्धचंद्र झपके, कॅबिनेट ऑफिसर ला.सी.ए.उत्तम बनकर, माजी नगरसेवक शिवाजी बनकर,महिला पंतसंस्था संस्थापक रामचंद्र बनकर, लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, क्रांतीज्योती महिला नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शक माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये नेहमी लायन्स क्लब व विविध संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले जाते व गरीब,वृद्ध रुग्णांना त्यांच्या दारीच सेवा देऊन समाजाचाही अभ्युदय साधला जातो. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!