डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे उज्ज्वल यश
इयत्ता 6 वीमधील कुमारी आराध्या ऋषिकेश पाटील या विद्यार्थिनीची पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांचे वतीने इयत्ता सहावी व नववी मधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार निर्माण करणे तसेच वैज्ञानिक संकल्पना दृढ करण्यासाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते. सदर परीक्षा लेखी स्पर्धा, प्रयोग स्पर्धा, कृती संशोधन व मुलाखत या चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.
सदर परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेमधील इ 6वी मधील संस्कृती संतोष लोंढे ,अथर्व पोपट काळेल ,विहंग अंकुश वाघमोडे,श्रावणी संजय दिवसे ,श्रेयश भारत शेंबडे, अमित अमोगसिद्ध कोळी,जान्हवी प्रशांत साळुंखे,प्रणव महेश शेवतेकर,निकिता गणेश माळी,यशराज जयंत केदार,ओम अनिल सांगोलकर,आयान जाकीर शेख ,स्नेहल दिलदार सावंत ,स्वरा वैभव बाजारे ,अनुष्का मुकुंद देशमुख,सेजल निनाद मोरे ,श्रावणी विकास भाले, असद निहाल तांबोळी, कल्याणी संजय वाघमारे, केतकी प्रकाश साळुंखे, आर्या संतोष पिसे, सिद्धी धनाजी शिर्के, संस्कृती सचिन चांडोले, युवराज अवधूत काशीद, श्रीवर्धन प्रशांत लिगाडे, ओम नागनाथ लिगाडे, श्रावस्ती उत्कर्ष चंदनशिवे, श्रेया शिवाजी बनकर, अथर्व राहुल चंदनशिवे, श्रेयश सुहास देशमुख, अर्णव सोमनाथ चौगुले हे 30 विद्यार्थी तर इयत्ता 9 वी मधील चैतन्य सयाजी घाडगे, प्रणव राजेश देशपांडे, जन्मेजयराजे जगन्नाथ भगत, यश आकाश बिले, भक्ती अंकुश काशीद, सिद्धी भारत सावंत, सबिया मूर्तुजा पटेल, ज्ञानेश्वरी महादेव जगताप, सृष्टी सुहास पाटील हे 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर आराध्या ऋषिकेश पाटील इ. 6 वी ड हिची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील रोहिणी शिंदे (इ. 6वी विभाग प्रमुख), अमोल रणदिवे (इ. 9 वी विभाग प्रमुख) तसेच शुभांगी घोंगडे, उत्तम बेहेरे, यतीराज सुरवसे तसेच वैभव कोठावळे (प्रशाला बाह्यपरीक्षा प्रमुख), नामदेव खंडागळे (संस्था बाह्यपरीक्षा प्रमुख) या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार संस्था सहसचिव सन्माननीय प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष मा. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्थाउपाध्यक्ष मा.म. वि.घोंगडे ,संस्था सचिव मा. म.शं. घोंगडे, खजिनदार मा. शं.बा. सावंत, कार्यकारणी सदस्य मा. विश्वेश झपके, मा.चंद्रशेखर अंकलगी यांचेसह प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्या सौ सय्यद मॅडम, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार ,बिभीषण माने यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.