आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून सांगोला नगरपालिकेच्या 130 कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला

सांगोला शहरात गेली आठवडा भरापासून गाजत असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचारी विषयांवर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथील कार्यालय येथे मुख्याधिकारी व सफाई कामगार यांची संयुक्त बैठक आयोजित करून करून मार्ग काढला आहे. मुदत संपलेल्या टेंडरची नव्याने प्रक्रिया जोवर पूर्ण होत नाही तोवर सर्वच्या सर्व म्हणजे १३० कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांना दिल्या
मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी त्यांची मागणी मान्य करून उद्यापासून सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केल्याने सांगोला शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, गुंडा दादा खटकाळे , समीर पाटील, सोमा ठोकळे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते
तसेच शहरात आरोग्य कर्मचारी कामावर नसल्याने गेली काही दिवस सर्वत्र अस्वच्छता पसरली होती आता पुन्हा एकदा सांगोला शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी १३० कर्मचारी सज्ज झाल्याने सांगोला शहरवासियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे सफाई कामगारांच्या ठेक्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नागपूर येथील अधिवेशनामध्ये निधीची मागणी करणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी सांगितले