सांगोला तालुकाक्राईममहाराष्ट्र

शेतीची औजारे, शेळया व जनावरे चोरी करणा-या दोन टोळींना जेरबंद करून सुमारे ३,८५, ५००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन सहा गुन्हे उघडकीस आणणेस सांगोला पोलीसांना यश

सांगोला पोलीस ठाणे हददीत सांगोला शहर व ग्रामीण भागात शेतक-यांचे शेतात असणारे शेतीचे औजारे, गोठ्यातील शेळया व जनावरे चोरीच्या घटना मागील काही दिवसात मोठया प्रमाणात घडलेल्या होत्या या घटनांना प्रतिबंध करणे व घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते या अनुंशगाने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. १०२१/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करीता असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे वाकी शिवणे, ता. सांगोला येथील शेळया व जनावरे चोरी करणारी टोळी असून ती शेळया व जनावरे चोरी करुन त्याची विक्री करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने सदर इसम नामे  अजित बुचडे,  दादासो  इंगोले, अतिश चोरकर, अजित होवाळ व एक विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला तालुक्यातुन वाकी शिवणे, महुद बु, बामणी, कडलास, वासुद अकोला अशा ठिकाणी शेळया व जनावरे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन त्यांचेकडून रोख रक्कम ४७५००/- रुपये किंमतीच्या शेळया विक्री करुन आलेली रोख रक्कम जप्त करुन सांगोला पोलीस ठाणे कडील पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सांगोला पोलीस ठाणे गु. र. नं. १०१४/२०२३ भा. द. वि. सं.क. ३७९ मधील फिर्यादी नामे अमीर इसाक शेख रा. महुद बु ता. सांगोला यांचे शेतीचे औजारे व इतर साहित्याची चोरी झाल्याचे सांगोला पोलीस ठाणेस गुन्हा दाखल असल्याने त्याचा तपास करीत असताना सांगोला पोलीस ठाणे हददीत शेतीचे औजारे व इतर साहित्याची चोरी करुन त्याची विकी करीत आहेत अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सदर इसम नामे १. सुनिल कांबळे, २. समाधान जाधव, ३. बबन मंडले  यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगोला तालुक्यातुन वाकी शिवणे, व महुद बु अशा ठिकाणी शेतीचे औजारे व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून सुमारे ३३८०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सांगोला पोलीस ठाणे हददीत शेळया व जनावरे चोरीच्या घटना पाठीमागील काही दिवसात घडलेल्या असून पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असुन पोलीस ठाणे हददीत वेगवेगळ्या ठिकाणी रात्रगस्त, नाकाबंदी नेमण्यात येते यामुळे काही दिवसापासून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनाना आळा बसला असुन यापुढे ही प्रभावी गस्त ठेवण्यात येणार आहे व अजुन अशा प्रकारचे चोरी करणारे टोळींना जेरबंद करुन शेतीचे औजारे, शेळया व जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणार आहे असे पोलीस निरिक्षक अंनत कुलकर्णी यांनी सांगीतले आहे.

सदरची कामगिरी श्री. शिरीष सरदेशपांडे साहेब, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. प्रितमकुमार यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, श्री. विकांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा, पोनि श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई / काशिद, पोना/१४२५ बाबासाहेब पाटील, पोकॉ/३३५ लक्ष्मण वाघमोडे, पोकॉ/२७६ निशांत सावंजी तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/०५ युसूफ पठाण यांनी मदत केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!