देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी उत्साहात संपन्न

सांगोला तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या २७व्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत नेत्रतपासणीचे आयोजन देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व क.महाविद्यालय,मेडशिंगी येथे बुधवार दि.०६ डिसेंबर रोजी करण्यात आले

 

होते.या शिबिराचे उदघाटन डॉ.ज्योती बाळासाहेब राऊत(मंदाकिनी क्लिनिक, मेडशिंगी)यांच्या हस्ते करण्यात आले.शिवशंभो ब्लड बँक,मोहोळ यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.या रक्तदान शिबिरामध्ये 91 जणांनी सहभाग नोंदविला.त्याचबरोबर मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 200 जणांनी सहभाग नोंदविला.याप्रसंगी मा.श्री.अरुण भाऊ शेंडे(अध्यक्ष,सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी),प्रशालेचे प्राचार्य अजित घोंगडे सर,श्री.तुकाराम शिंदे,श्री.प्रतापसिंह इंगवले सर,श्री.सुनील शिंदे,श्री.बाळासो लेंडवे,प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,रक्तदाते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa