सांगोला तालुकाक्रीडा

भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जय मातृभूमी,सांगली संघाने प्रथम क्रमांक पटकावला

सांगोला पंचायत समितीचे पहिले सभापती,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांच्या २७ व्या स्मृतीदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा(पुरुष)आयोजित करण्यात आल्या होत्या.

 

या स्पर्धेचे उदघाटन सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली उबाळे मॅडम आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.बगाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अरुणभाऊ शेंडे,मेडशिंगी गावचे सरपंच मा.श्री.प्रतापसिंह इंगवले सर,उपसरपंच मा.श्री.अमर गोडसे,सांगोला तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री.सुनील भोरे सर,मा.श्री.तुकाराम शिंदे,मा.श्री.बाळासो लेंडवे,सांगोला तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे प्राचार्य मा.श्री.अजित घोंगडे सर,पर्यवेक्षक मा.श्री.सूर्यकांत कसबे सर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या स्पर्धेत पुणे,सांगली,सोलापूर,कळंब,पाठकळ, डोंगरगाव या विविध संघांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेतील अंतिम सामना जय मातृभूमी,सांगली व भैरवनाथ कबड्डी संघ,पुणे(अ) या दोन संघामध्ये झाला.या चुरशीच्या अंतिम लढतीत जय मातृभूमी,सांगली संघाने विजय मिळवला.या संघाला पारितोषिकामध्ये रोख रुपये ३१,००१/-आणि चषक देण्यात आले.तर उपविजेत्या भैरवनाथ कबड्डी संघ,पुणे(अ) या संघाला २५,००१/-आणि चषक,तृतीय क्रमांकासाठी भैरवनाथ कबड्डी संघ,पुणे(ब) संघाला २०,००१/-आणि चषक,चतुर्थ क्रमांकासाठी स्वराज्य स्पोर्ट्स क्लब,सांगोला(अ) संघाला १५,००१/-आणि चषक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसामध्ये मालिकावीर-पृथ्वीराज शिंदे(भैरवनाथ कबड्डी संघ,पुणे), उत्कृष्ट चढाई-गणेश तारू(जय मातृभूमी,सांगली), उत्कृष्ट पकड-प्रदीप भगत(भैरवनाथ कबड्डी संघ,पुणे) या संघातील खेळाडूंना देण्यात आले. संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या शांततेत पार पाडण्यासाठी सांगोला तालुका कबड्डी असोसिएशन व टीमचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!