सांगोला तालुकामहाराष्ट्र

एल के पी मल्टीस्टेट शाखा- सांगोला या संस्थेचा वर्धापन दिन व दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न

सांगोला -संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्य कार्यक्षेत्रामध्ये सुमारे ४३ शाखांद्वारे बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणारी व १०० कोटी ठेवीकडे वाटचाल करणारी अग्रगण्य संस्था एल के पी मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.सोलापूर शाखा सांगोला संस्थेचा वर्धापन दिन व संस्थेच्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते काल सोमवारी उत्साहात संपन्न झाला.

यानिमित्ताने संस्थेच्या कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. यावेळी संस्थेचे सभासद, ठेवीदार यांनी एल के पी मल्टीस्टेट शाखेस सकाळपासून भेट देऊन शुभेच्छा  देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गेल्या वर्षभरात सभासद ठेवीदार यांनी सांगोला शाखेकडे सुमारे १५ कोटी रुपयेच्या ठेवी ठेवून  संस्थेवरचा विश्वास दृढ केला आहे. या सांगोला शाखेतून ठेवीदार कर्जदार, व्यापारी, सभासद यांना एनएफटी, आरटीजी, एस आय एम पी एस सेवा पूर्णपणे मोफत  दिल्या जातात.

यापुढेही बँकिंग क्षेत्रातील नवनवीन चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल इंगोले यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी डॉ. बंडोपंत लवटे, सीईओ राजकुमार बहिरे, रीजनल मॅनेजर शशिकांत पाटील ,शाखा अधिकारी सुजित केदार, संतोष इंगोले, अण्णासाहेब इंगोले, मोहन इंगोले यांच्यासह सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार , व्यापारी, कर्जदार, सभासद, राजकीय क्षेत्रातील मान्यवर पत्रकार आदींनी  उपस्थित राहून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.शेवटी आभार शाखाधिकारी सुजित केदार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!